मकरंद गोंधळी यांच्या बालकविता संग्रहास पुरस्कार जाहीर



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील कलाविश्व रंगभूमी संस्थेचे मार्गदर्शक, ज्येष्ठ रंगक्रर्मी , साहित्यिक व निवृत्त शिक्षण सहसंचालक मकरंद तथा एम के गोंधळी यांच्या ' टन टना टन ' या बाल कविता संग्रहास अमरेंद्र भास्कर बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३१ मे रोजी पुणे येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सन २०२४ मधील प्रकाशित झालेल्या बाल साहित्याला पुरस्कार जाहीर झाले आहेत.   

     पुणे येथे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व बाल साहित्यकार डॉ न म जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. 

        कोल्हापूरचे निवृत्त शिक्षण सहसंचालक एम के गोंधळी यांनी कथा , कविता, लेखन साहित्य क्षेत्रात विशेष कार्य केले असून विविध साहित्य संमेलनामध्ये त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. नाट्य अभिनय, बाहुली नाट्य व एकपात्री कलाकार म्हणून त्यांचा परिचय आहे. मकरंद गोंधळी यांच्या ' टण टणा टण ' या बालकाव्य संग्रहास पुण्याच्या अमरेंद्र भास्कर बाल कुमार साहित्य संस्थेचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष