गुजरातच्या द खेडूत कारखान्याच्या शिष्टमंडळाची श्री दत्तला सदिच्छा भेट

शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :

      द खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बाबेन, बारडोली, जिल्हा सुरत (गुजरात)च्या संचालक व अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.

      संचालक सुरेशभाई एस. पटेल, संचालक प्रवीणभाई पटेल, कार्यकारी संचालक हेमप्रकाश सिंग, मुख्य इंजिनिअर राकेशभाई पटेल, मुख्य केमिस्ट अरविंद कटियार यांनी प्रत्यक्षात कारखाना स्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रोडक्शन मॅनेजर विश्वजित शिंदे यांनी तांत्रिक कार्यक्षमता आणि तांत्रिक बाबींची सखोल माहिती दिली.

      मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पाची माहिती प्रोजेक्टर द्वारे दिली. सेंद्रिय कर्ब वाढ, सुपर केन नर्सरी, ऊस उत्पादन वाढीसाठी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली. कारखान्याच्या वतीने सर्वांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

      यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, इंद्रजीत पाटील, शेखर पाटील, संजय पाटील, महेंद्र बागे, कार्यकारी संचालक एम. व्हि. पाटील, वर्क्स मॅनेजर आय. एम. मुलाणी, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, सहाय्यक दीपक कळेकर, संतोष दुधाळे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष