श्री दत्त उद्योग समूहाच्या वतीने गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या महाविद्यालयातील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व विषय शिक्षकांचा सत्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी दत्त उद्योगाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सन 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षा मध्ये श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत बोर्डामध्ये प्रथम क्रमांक, महाविद्यालयामध्ये प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमांक मिळवलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे गुणवंत विद्यार्थी घडविणारे संकुल असून क्रीडाक्षेत्राबरोबरच इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांचीही अथक प्रयत्न आहेत. असेच यापुढे गुणवंत विद्यार्थी या महाविद्यालयातील शिक्षक घडवतील अशी अशा व्यक्त करत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील, सदस्या श्रीमती विनया घोरपडे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांचे सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा