घोसरवाड हायस्कूल दहावीचा निकाल ९८ . १८ टक्के

 


बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ घोसरवाड, संचलित. घोसरवाड हायस्कूल घोसरवाड या शाळेचा दहावीचा निकाल ९८. १८ टक्के गुणाने उज्ज्वल यश प्राप्त करून शाळेने उत्कृष्ट अशा निकालाची परंपरा जोपासली. यामध्ये कु. सई विनोद मोडके हिने ९३. ४० टक्के इतके गुण मिळवून दत्तवाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविली. व तसेच कु. शितल आप्पासो चिगरे ८८. २० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविल्या तर अभय शिवाजी नाईकवाडे यांने ८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आणि याच बरोबर कु. श्रेया रमेश कदम हिने ८२. ६० टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ तर कु. कार्तिकी कृष्णात पाटीलने ८१.६० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांकाने यश प्राप्त केली. या परीक्षेस एकूण ५५ विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी ५४ विद्यार्थी उतीर्ण होवून यश मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांने आभ्यासात जिद्द, चिकाटी, आणि मेहनतीच्या जोरावर गुण प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, सचिव विजीतसिंह अजीतसिंह शिंदे ( सरकार ) तर शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण निवृत्ती शिंदे या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून अभिनंदन केले. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर आणि कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष