शंकर माने यांचे कार्य प्रेरणादायी : आ. डॉ.अशोकराव माने
तारदाळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शंकर माने यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीस कुटुंबाच्या प्रगती बरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी केले.
कोंडीग्रेचे सुपुत्र शंकर बाळू माने यांचा 75 वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा गुरूवारी श्री गजानन महाराज सांस्कृतिक हॉल खोतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. अशोकराव माने हे बोलत होते
आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने बापु यांचे हस्ते शंकर माने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ निता अभिजीत माने, काशिनाथ गायकवाड, बी एस महाजन, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सुत गिरणीचे संचालक जयदीप पाटील, सुनील कामत, किरण भोसले, संतोष माने, अमोल माने, आदेश खाडे व माने परीवार व मित्र मंडळी उपस्थित होते. आण्णासाहेब बिलोरे, शितल कदम दत्तात्रय बामणे, आप्पालाल शेख आदिनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमांचे सुत्रसंचालन डॉ दगडु माने यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा