टाकवडे वॉर्ड नं ४ मध्ये विकास कामे होत नसल्याने नागरिक संतप्त ; गटारीचे सांडपाणी रस्त्यावर
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
टाकवडे, ता. शिरोळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून चार नंबर वार्डातील नागरिक सुख सोयीस्करपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येथील नागरिकांनी चार वॉर्डातील गटारी व सांडपाणी समस्या सोडविण्याची वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही कोणतीही विकास कामे होत नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्यामुळे घरातील सांडपाणी व पावसाचे पाणी यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहत आहे.
रस्त्यावर सांडपाणी पसरल्याने दुर्गंधी वास येत आहे. त्यामुळे डेंगू चिकनगुनिया सारखे आजारांना नागरिक बळी पडत आहेत. प्रशासन आमचा उपयोग फक्त मतासाठीच करणार का ? असा प्रश्न लोकप्रतिनिधींना नागरिक विचारत आहेत. वेळोवेळी ग्रामपंचायत तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही त्यामुळे तहसीलदार शिरोळ यांना लेखी पत्र देत आहोत अशी माहिती आनंदा भीमराव चव्हाण यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा