अहिंसेचाच खरा बुद्धाचा धम्म – प्रा. एन. डी. जत्राटकर

 साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

अहिंसेचा मार्ग हाच तथागत गौतम बुद्धांचा खरा धम्म आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. एन. डी. जत्राटकर यांनी केले.

तथागत गौतम बुद्धांच्या २५६९व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रोहिणी नगर, निपाणी येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रा. जत्राटकर पुढे म्हणाले, “मानवतेला सुखी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अहिंसा. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अधिक गुंतागुंतीचे होतात.” कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सर्व उपासक-उपासीकांनी त्रिशरण आणि पंचशील घेतले.

यावेळी ज्येष्ठ विचारवंत अॅड. अविनाश कट्टी, भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका संघटक पुंडलिक कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक आयु. महेश धमरक्षित, जिल्हा मुख्य संघटक प्रा. अनिल मसाळे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य पंडित कांबळे, निपाणी तालुका अध्यक्ष प्रताप शितोळे, तालुका कार्याध्यक्ष प्रा. प्रशांत कांबळे, तालुका खजिनदार उदय कांबळे, संघटक राज धनानंद, विनोद कांबळे, शशील वराळे, शशिकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मेस्त्री, संदीप कांबळे, प्रणव कांबळे, प्रमोद कांबळे, कुमार देवदास, कविता प्रधान, चांदनी पुजारी, कट्टी मॅडम, लोकेश घस्ते, अमित कांबळे, उमेश कांबळे, राहुल कट्टी, महेश पडलीहाळकर, कुणाल पुजारी, अनुराग प्रधान, प्रभाकर माळगे, राहुल शितोळे, सदाशिव तराळ, शिवगोंडा बनकनवर, गोरखनाथ मधाळे, पांडूमा मधाळे, अनिल माने यांच्यासह अनेक उपासक व उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अनिल प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन आणि स्वागत राज्य समन्वयक महेश धमरक्षित यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल मसाळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष