नसलापूर येथे 21 जून 2025 रोजी आयटी पदवी धारकांसाठी रोजगार भरती
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील अल्पावधीत लोकप्रिय आलेली श्री जिन लक्ष्मी सौहार्द सहकारी संघ नियमित व अल्टीअस आयटी टेक चे मालक श्री सागर मिरजे यांच्या संयुक्त विद्यमाने नसालापुर येथे आय टी क्षेत्रातील पदवी धारकांसाठी रोजगार भरती चे आयोजन जिन लक्ष्मी सौहार्द संस्थे शाखा नसलापुर येथे शनिवार दिनांक 21जून रोजी करण्यात आले आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, मात्र आज आधुनिक काळात शिक्षण क्षेत्राला उच्च स्थान प्राप्त झाले असून अनेक युवा युवतीने उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. या गोष्टीचा विचार करून बोरगाव येथील अल्पावधीत नावावर पात्र असलेल्या श्री जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघ नियमित बोरगाव या संस्थेचे संस्थापक श्री सागर मिरजे व अध्यक्ष संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली नसलापूर तालुका रायबाग येथे येत्या शनिवारी दिनांक 21 जून 2025 रोजी" जॉब इंटरव्यू" म्हणजे आय टी मेगा भरती चे आयोजन करण्यात आले आहे .
सीमा भागातील उच्चशिक्षित आय टी मधील पदवीधारकांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी नवी मुंबई येथील हेल्थ आयटी सोल्युशन चे मालक सागर मिरजे व जिनलक्ष्मी सौहार्द संस्थे यांनी नसलापूर येथे आयटी पदवी धारकासाठी मेगा भरती चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेकडून पत्रकार परिषदेत दिली आहे.
रोजगार भरतीच आयटी पदवीधारकाने संधीच सोनं करून घेऊन घ्यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सागर मीरजे यांनी या अगोदर ही रोजगार भरती चे आयोजन केले होते, शिक्षण घेऊन सुद्धा आज अनेक युवक बेरोजगार आहेत.या हेतूने भरतीचे आयोजन केले आहे.
यावेळी जिन लक्ष्मी सौहार्द सहकारी संघाचे चेअरमन अजित पाटील, संचालक प्रवीण हावले, निलेश पाटील, श्रीमंधर पाटील, नसलापूरचे पासगोंडा पाटील, विजय शेडबाळे, डॉ. प्रकाश पाटील , श्रेनिक पाटील, दर्शन पाटील, समजे सर व आलटीएस टेक चे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा