वायुसेनेतील जवान अमर पाटील यांच्या कडून विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या शूर जवानां मधील वायुसेनेतील जवान अमर अशोक पाटील यांनी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किटचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व खेळामध्ये कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आपण सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांना मोफत किट दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . यावेळी त्यांचा संस्थेचे संचालक रामचंद्र पाटील व एस.वाय पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . दरम्यान अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावलेले प्रवासी व कन्या विद्या मंदिर चे माजी मुख्याध्यापक विष्णू पाटील यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी स्तब्धता पाळण्यात आली . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील, क्रीडा शिक्षक उदय पाटील , माजी सैनिक बबन पाटील , ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल पाटील, सयाजी पाटील वैभव पाटील , सविता बावचे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार आर.एम. पाटील यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा