सौ. कविता हराळे यांना अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
दानोळी येथील सौ.कविता अजय हराळे यांना आहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था,कराड व आँल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने आहिल्यारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पत्रकार अजय हराळे यांच्या सौभाग्यवती सौ.कविता हराळे या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय जयसिंगपूर याठिकाणी 4 वर्षांपासून कार्यरत असून अत्यंत पारदर्शकपणा व उल्लेखनीय योगदानाची ही पोहच पावती ठरणार आहे.अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ३०० महिला यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे पैकी कराड येथे १४१ व पुणे व मुंबई येथे होणार आहे.आहिल्यादेवी ट्रस्ट कराड व आँल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण काकडे यांच्या मार्गदशनखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा