हेरवाड येथे ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थिनींचे स्वागत

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे सोमवारी (दि. १६ जून ) रोजी नवागत विद्यार्थिनींसाठी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मुलींचं औक्षण करून, फुगे देऊन आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसर आनंदोत्सवाच्या वातावरणात न्हालेला दिसून आला.

कार्यक्रमात सर्व नवागत विद्यार्थिनींना शाळेच्या वतीने पाठ्यपुस्तकं, गणवेश व बूट वाटप करण्यात आले. शाळेने घेतलेला हा उपक्रम पालकांमध्ये समाधान निर्माण करणारा ठरला.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता व्ही.आर. टोण्णे, हेरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेखा अर्जुन जाधव, उपसरपंच भरत पवार, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान नदाफ, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी सर्वांचे स्वागत केले. स्वागतपर भाषण, आभार प्रदर्शन व विद्यार्थ्यांच्या आनंददायक सहभागाने कार्यक्रम संस्मरणीय ठरला. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी करण्यासाठी घेतलेला हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष