श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात शाहू महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

 येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या पुतळ्यास व्याख्याते श्री. बाबासाहेब नदाफ व श्री. रावसाहेब आलासे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. जे. पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना व्याख्याते श्री. बाबासाहेब नदाफ म्हणाले, "छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक परिवर्तनाचे खरे अग्रदूत होते. सर्व जाती-धर्मांतील लोकांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये विविध बोर्डिंग सुरू केली. पुनर्विवाह कायदा अमलात आणणारे ते पहिले राजे होते. स्वतः राजे असूनही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबईत जाऊन सत्कार केला. कोल्हापूर जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी राधानगरी धरण उभारले. विद्यार्थ्यांनी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही महामानवांचे चरित्र वाचून त्यांच्या विचारांना कृतीत उतरवावे.

"क्रीडा क्षेत्रात सर्वसामान्यांची मुले पुढे यावीत, यासाठी त्यांनी कुस्ती मैदाने उभारली. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे काळाची गरज आहे," असेही नदाफ यांनी सांगितले.

कार्यक्रमात शाहू महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे पूजन, भित्तीपत्रकांचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. आर. जे. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहायक शिक्षक श्री. आर. आर. टाकमारे यांनी तर सूत्रसंचालन श्री. एस. डी. म्हसकर यांनी केले.

कार्यक्रमास व्याख्याते श्री. बाबासाहेब नदाफ, श्री. रावसाहेब आलासे, प्राचार्य श्री. आर. जे. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष