सैनिक टाकळी येथील डॉ. विष्णू निर्मळे यांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार जाहीर



सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक टाकळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू निर्मळे यांना जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २६ जून रोजी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

डॉ. निर्मळे यांनी पशुवैद्यकीय सेवेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कार्य करत स्थानिक जनतेच्या सेवा-सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या समर्पित कार्यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर २७ जून रोजी सैनिक टाकळी येथील कुमार कन्या विद्या मंदिर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विविध शाळांच्या वतीने डॉ. विष्णू निर्मळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून शिक्षणाची महत्त्वाची जाणीव करून दिली.

कार्यक्रम प्रसंगी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, तसेच जिल्हा भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष