श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड येथे शनिवार, दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात योग शिक्षक श्री. शरद तिप्पन्नावार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगत विविध योगासने व सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य श्री. आर. जे. पाटील यांनी श्री. तिप्पन्नावार यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहाराबरोबरच शरीराची लवचिकता व मानसिक संतुलन राखण्यासाठी योग उपयुक्त आहे.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना योगाची शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली. कार्यक्रमात शारीरिक व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार शिकवण्यात आले. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व लक्षात घेतले. 

कार्यक्रमास एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि काही पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात उत्स्फूर्त सहभाग घेतला. योग दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे करून यशस्वीरीत्या पार पाडले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष