कनवाडमधील नुकसानग्रस्त जमिनींचा तात्काळ पंचनामा करा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कनवाड गावातील कृष्णा नदीच्या पुराने वाहून गेलेल्या अकरा एकर शेतीच्या नुकसान प्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तात्काळ दखल घटनास्थळाची पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
कनवाड परिसरात म्हैशाळ-कनवाड बंधाऱ्याचे काम सुरू असून, या कामासाठी ठेकेदाराने म्हैशाळ हद्दीत नदीच्या पात्रात मातीचा तात्पुरता बांध उभारला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो बांध काढणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे कृष्णा नदीने पात्र बदलल्याने गट नंबर 175 ते 200 या शिवारातील सुमारे अकरा एकर शेती वाहून गेली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत आमदार यड्रावकर यांनी तातडीने लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे त्वरित करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे आदेश त्यांनी दिले. महसूल विभागाचे तलाठी शिकलगार तसेच पाटबंधारे विभागाच्या थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून शेतजमिनीची पाहणी करून पंचनामे सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच इरफान बुराण, सदस्य अख्तर पटेल, करिम इनामदार, सुरेश नाईक, घुडू पटेल, बाबासाहेब इनामदार, राहतहुसेन इनामदार, किस्मत जमादार, हमीद इनामदार, नासीर इनामदार, मिया इनामदार, शहाजान इनामदार, कमरुद्दिन इनामदार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा