मिस क्लार्क वस्तीगृह हे गुणवतेचे संस्कार केंद्र : डॉ दगडू माने

कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

फुले -शाहू -आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता म्हणून समाजकार्यात योगदान देत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील मिस क्लार्क वस्तीगृह संस्थेत माझ्या कार्याची दखल घेऊन सन्मान झाल्याने मला अभिमान वाटतो. शाहू राजेंनी दूरदृष्टीतून निर्माण केलेल्या या वस्तीगृहामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले असून मागासवर्गीय, गोरगरीब व वंचित घटकासाठी सुरू झालेले हे वस्तीगृह नव्या पिढीच्या गुणवत्तेचे संस्कार केंद्र ठरले आहे. असे मत शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व सिनेअभिनेते डॉ दगडू माने यांनी व्यक्त केले.

     कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शाहू जनता शिक्षण संस्था संचलित मिस क्लार्क वस्तीगृहात शाहू जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चेअरमन प्रा सतीश माने यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळालेबद्दल डॉ दगडू माने (शिरोळ ) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल राजेंद्र घाडगे (मिणचे ) यांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला. त्यावेळी राज्य शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ दगडू माने बोलत होते.

            अध्यक्षीय भाषणात चेअरमन प्रा सतीश माने म्हणाले, मिस क्लार्क वस्तीगृह संस्थेने भावी पिढीचे हित लक्षात घेऊन काम सुरू ठेवले आहे. अशा कामाला समाजाचेही पाठबळ मिळत असून समाजासाठी निस्पृह भावनेने सामाजिक बांधिलकी जोपासून बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल राज्य शासनाच्या समाजभूषण पुरस्कारार्थीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी मिस क्लार्क वस्तीगृह संस्थेने सत्कार केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र घाटगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

      या कार्यक्रमास मिस क्लार्क वस्तीगृह संस्थेचे व्हाईस चेअरमन के डी कांबळे ,सचिव दीपक कांबळे ,संचालक राजेश माने, अधिक्षक रोहीत विणकरे ,माजी अधिक्षक सुधाकर विणकरे, माजी शासकीय अभियंता पांडे ,दलितमित्र बी बी जाधव गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते सचिन कमलाकर, रामभाऊ लामदाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष