शिक्षक-विद्यार्थी हे दैवत तर शाळा हे मंदिर आहे : सौ. भारती कोळी
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
"शिक्षण विभागाच्या यशात शिक्षकांचा मोलाचा वाटा असून शिक्षक आणि विद्यार्थी हे दैवत आहेत, तर शाळा हे खरे मंदिर आहे," असे मत शिरोळ गटाचे गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी यांनी व्यक्त केले. त्या साई मंदिर, दत्तवाड येथे केंद्रप्रमुख संजय निकम यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक कोकणे होते.
पुढे बोलताना सौ. कोळी म्हणाल्या की, संजय निकम सरांनी सेवेतील कार्यकाळात तसेच निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे दत्तवाड केंद्रात ‘एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम’ सुरू झाला. या उपक्रमासाठी त्यांनी स्वतः २१,००० रुपयांची देणगी दिली आहे. अशा शिक्षकांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.
गौरव मूर्ती संजय निकम यांनी आपल्या ३७.६ वर्षांच्या शैक्षणिक सेवापर्वाचा आढावा घेत, आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमात शिक्षक नेते राजू जुगळे, सरपंच चंद्रकांत कांबळे, कु. सेजल निकम, संभाजी कदम, दत्तात्रय कमते आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी व गौरव मूर्ती संजय निकम यांचा मानपत्र, पेहराव, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत केंद्रप्रमुख मुख्याध्यापक सतीश यळगुडे यांनी केले, तर प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन दिलीप शिरढोणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद अवघडी यांनी केले.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी अरुणा शहापूरे, विजीतसिंह शिंदे सरकार, मिनाज जमादार, मयूर खोत, बी. वाय. शिंदे, दौलत माने, बाबासाहेब माने, अण्णाप्पा सिदनाळे, डी. एन. सिदनाळे, धनपाल जुगळे, सुरेश पाटील बाळगोण्णावर, शब्बीर नाईकवाडे, प्रमिला सिदनाळे, राजगोंडा पाटील, शांताराम हेमगिरे, बाबुराव पोवार, संजय पाटील, संजय माने, अशोक नेर्ले, सीमा पाटील, प्रमोद पाटील, अमित माने, तेजस वराळे, तलाठी मुजावर, पोलिस पाटील संजय पाटील (टोपाई), अण्णा मुंडे, सुनील एडके, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, दिलीप पाटील, स्मिता डिग्रजे, विनायक मगदूम, संतोष जुगळे, सुरेखा कुंभार, संतोष कोळी, संजय कुंभार, मेहबूब मुजावर, यशवंत पेठे, सलीम अत्तार, सुभाष कुरुंदवाडे, रामचंद नंदिकुरळे, शितल चव्हाण, सतीश चव्हाण, राजू ढोणे, पत्रकार बाळासाहेब कोकणे, मिलिंद देशपांडे, मुन्नाभाई नदाफ यांच्यासह दत्तवाड ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक पतसंस्था, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, मुख्याध्यापक, शिक्षक, सीमाभागातील शिक्षक, शालेय पोषण आहार ठेकेदार व मदतनीस, ग्रामस्थ, स्नेही आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा