डॉ. दगडू माने यांच्या कार्याचा सन्मान – राजू शेट्टी



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

डॉ. दगडू माने यांना राज्य शासनाकडून मिळालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा त्यांच्या प्रामाणिक लोकसेवेच्या कार्याची मिळालेली योग्य पावती आहे. सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे चीज झाले, असे गौरवोद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले.

मुंबई येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. माने यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सौरभ शेट्टी, सचिन सूर्यवंशी, भरत कार्वेकर, राजेंद्र दाभाडे, लता जाधव, संगिता माने, नायकू माने, श्रेयश माने, वैभव माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राजू शेट्टी पुढे म्हणाले की, "समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्यांची दखल शासन घेत असल्याचे या पुरस्कारातून दिसून येते. डॉ. दगडू माने यांच्या कार्याने तरुणांसाठी प्रेरणादायी भूमिका बजावली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ शेट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन सूर्यवंशी यांनी मानले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष