बदलत्या परिस्थिती नुसार युवकांनी स्वयंम रोजगाराला प्राधान्य द्यावे : चेअरमन अजित पाटील
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
आज आधुनिक काळात शिक्षणाला अधिक महत्त्व आहे, सरकारी नोकरी मिळवताना युवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा पदवीधर नोकरी विना वंचित आहेत. बदलत्या परिस्थितीत युवकांनी शासकीय नोकरीला फाटा देत स्वयं उद्योग उभारने ही काळाची गरज आहे. असे मत बोरगाव येथील जीन लक्ष्मी सौहार्द संघाचे चेअरमन अजित पाटील यांनी केले. ते जिनलक्ष्मी सौहार्द संघ शाखा नसलापूर व मुंबई येथील अलटीयएस टेक हेल्थ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयटी पदवीधर यांच्या नसलापूर येथील मेळावा कार्यक्रमात अध्यक्ष स्थान वरून बोलत होते.
प्रारंभी भाग्यलक्ष्मी देवतेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भव्या रेडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुढे बोलताना चेअरमन अजित पाटील म्हणाले की बोरगाव येथील जिनलक्ष्मी सौहार्द संस्था नेहमीच उद्योजकांना स्वयम उद्योगासाठी अर्थ सहकार्य करत आहे .आमच्या संस्थेचे संस्थापक व अलटीयएस हेल्थ केअर चे मालक सागर मिरजे व बोरगाव येथील जिन लक्ष्मी सौहार्द सहकारी संघ यांच्या प्रयत्नातून नसलापूर व बावान सौंदती परिसरातील आयटी क्षेत्रातील पदवीधर युवकांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजिन करण्यात आले आहे .या मेळाव्यातून युवकांनी संधीच सोनं करून घ्यावे असे मत शेवटी जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाचे चेअरमन अजित पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पासगोंडा पाटील, भव्या रेडी सह मान्यवरांनी उपस्थीत मेळाव्याला संबोधित मार्गदर्शन केले, एकंदर नसलापूर सह परिसरातील 120 पेक्षा जास्त आयटी पदवीधारकांनी या मेळाव्यात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास डॉ, एस ए मगदूम, बोरगाव येथील संस्थेचे चेअरमन अजित पाटील, डॉ सुकुमार चौगुले, डॉ विजय उपाध्ये, डॉ प्रकाश पाटील, विजय शेडबाळे सीईओ भव्या रेडी, सुनील बस्तवाडे ,शाहिद आली, वर्धमान बनवणे, दर्शन पाटील, मलगोंडा पाटील, श्रेनिक पाटील, रोहित समाज, संतोष शेडबाळे ,सागर क्रांती, सुधीर तेरदाळे, संजय नरवाडे, यांच्यासह आयटी पदवीधारक व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा