गुरुदत्त शुगर्स तर्फे ऑपरेशन सिंदूर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जवान सचिन लोहार यांचा सत्कार
![]()  | 
| ऑपरेशन सिंदूर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल टाकळीवाडी चे जवान सचिन उर्फ नितीन लोहार यांचा सत्कार गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्ट राहुल घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. | 
टाकळीवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये प्रत्यक्षसहभागी असलेले टाकळीवाडी गावचे जवान सचिन ऊर्फ पांडुरंग लोहार यांना ऑपरेशन सिंदूरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुरुदत्त शुगर्स च्या वतीने एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले आहे. पंजाब येथील पठाणकोट या ठिकाणी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या वतीने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लोहार यांनी सहभागी होऊन देश सेवेचे महानकार्य केले.
टाकळीवाडीचे सुपुत्र सचिन उर्फ पांडुरंग अण्णासाहेब लोहार बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सेवा बजावत आहेत. सचिन हा सैन्य दलामध्ये २०१० या वर्षी भरती झाला. सध्या तो पठाणकोट पंजाब येथे आपली देश सेवा बजावत आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबदल १०९ बटालियन सीमा सुरक्षा बलाचे कमांडंट सुरेश सिंग यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. गावामध्ये या सैनिकांचे कौतुक होत आहे. यावेळी आनंद उन्हाळे , संजय लोहार, संजय कुंभार, अजित बिरणगे व रामदास लोहार आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा