स्व. श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त घोसरवाड येथे विद्यार्थिनींना २१ रोजी वही-पेन वाटप
बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या विद्या मंदिर शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थिनींना शनिवार, दिनांक २१ जून रोजी वही आणि पेन वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम स्व. श्रीमती रुक्मिणी फडतारे यांच्या १३व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून, अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणारा हा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.
स्व. रुक्मिणी फडतारे या आदर्श माता म्हणून समाजात परिचित होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन फडतारे परिवाराकडून करण्यात येते. यंदा विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा उद्देश आहे. शनिवार, २१ जून रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना वही-पेन वाटप करण्यात येणार आहे.
या उपक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि शिक्षकवृंद सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन फडतारे परिवार आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा