छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये स्वर्गीय ए. वाय. पाटील (काका) यांना अभिवादन
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये स्वर्गीय ए. वाय. पाटील (काका) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इंजिनीयर उमेश पाटील यांच्या हस्ते काकांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय ए. वाय. पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्व .देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार व स्वर्गीय सा.रे. पाटील या गटामधून त्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी सक्रिय प्रयत्न केला होता. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी सलग तीन वेळा चेअरमन पद भूषविले होते. गावातील विविध संस्था स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सरपंच पदापासून ते पंचायत समिती सदस्या पर्यंत त्यांनी विविध पदे भूषवली होती. दरम्यान शाळेच्या परिसरात शालेय पोषण आहारासाठी उपयुक्त असणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील, ए.टी.काटकर,उदय पाटील यांच्या सह दोन्ही शाळेतील स्टाफ उपस्थित होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा