हजरत दौलतशाह वली दर्गाह उरुसास गुरूवारपासून सुरुवात

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

          कुरुंदवाड नगरीतील ग्रामदैवत हजरत दौलतशाह वली दर्गाहचा वार्षिक उरुस यंदा बुधवार,18 तारखेपासून सुरू होत असून, गुरुवार 19 तारखेला उरुसाचा मुख्य दिवस असणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी पाच वाजता संदल व गलेफ विधी धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहेत. उरुसासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती गाव दर्गा विश्वस्त कामगार पोलीस पाटील व माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.

         दरम्यान गुरुवार, १९ जून रोजी उरुसाचा मुख्य दिवस असून, या दिवशी दर्ग्याभोवती भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. यामुळे पोलीस ठाणे ते जुनं बसस्थानक आणि दर्ग्याच्या परिसरातील आठवडी बाजार विक्रेत्यांना तात्पुरते स्थलांतर करण्याचे आवाहन दर्गाह समिती आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

     दरवर्षी बकरी ईदनंतरच्या पहिल्या गुरुवारी हा उरुस साजरा केला जातो. त्यानुसार, बुधवार सायंकाळी मिरवणुकीद्वारे संदल रावसाहेब पाटील यांच्या वाड्यातून दर्ग्याकडे आणण्यात येणार असून, त्यानंतर मानद मुतवल्ली, विश्वस्त, फकीर यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पाडले जातील. अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत उरुसास प्रारंभ होईल.

      उरुसाच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तीन दिवसांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या उत्सवात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन उरुस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

       यावेळी अजित पाटील,अख्तर मुल्ला, युनूस मुल्ला,मज्जिद मुल्ला, मुस्तफा मुल्ला, दस्तगीर मुल्ला,तनवीर मुल्ला,बापू मुल्ला,मोहसीन मुल्ला,शकील गरगरे सह सर्व विश्वस्त व मुल्ला समाज बांधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष