खिद्रापूर - जुगूळ पुलाच्या जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

 भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना आमदार यड्रावकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान 

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला खिद्रापूर – जुगूळ पुलाच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक असलेला भूसंपादनाचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमीन हस्तांतराची प्रक्रिया पार पडल्याने हा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही केवळ आर्थिक देवाणघेवाण नसून, शेतकऱ्यांनी विकासासाठी सहकार्य केलेले हे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथे शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द करताना केले.

कर्नाटक शासनाच्या वतीने कृष्णा नदीवर खिद्रापूर – जुगूळ दरम्यान नवीन पूल उभारण्यात आला आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आता त्याचा महाराष्ट्र हद्दीतील जोडरस्ता तयार होणे आवश्यक होते. मात्र, या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण हे गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होते. पुलाच्या महाराष्ट्र बाजूच्या जोडरस्त्यासाठी चार गटांतील शेतकऱ्यांच्या जमिनी लागणार होत्या.

आमदार यड्रावकर यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित खात्याशी सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय आणि मोबदला मिळवून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमीन हस्तांतरणास संमती दिली, आणि गेल्या अनेक दिवसापासून रखडेला प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

गावच्या उपसरपंच पूजा पाटील – खानोरे यांनी या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यांचे यामध्ये मोठे योगदान असल्याचे आमदार यांनी आवर्जून नमूद केले. या पुलामुळे केवळ दोन गावांचा नव्हे, तर दोन राज्यांचा थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे. खिद्रापूरच्या ऐतिहासिक मंदिर व पर्यटनस्थळाच्या विकासालाही चालना मिळेल, असेही आमदार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी दयानंद खानोरे, आशपाक ढालाईत, इर्षाद मुजावर, अमित कदम, संतोष कदम, रमेश खोत, ताहिर मोकाशी, हिदायत मुजावर, रावसाहेब रायनाडे, राजू सुंके कनिष्ठ अभियंता रविराज चव्हाण, वरिष्ठ लिपिक एन. ए. मुल्ला व इतर शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष