अनन्या शिरोळे हिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम ; विद्यार्थीनिंना वह्या, पेन्स व प्लेट्स वाटप

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 समाजातील संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरवत, संतोष शिरोळे यांची कन्या अनन्या हिचा दुसरा वाढदिवस हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

अनन्याचा पहिला वाढदिवस देखील असाच समाजोपयोगी कार्य करत साजरा करण्यात आला होता. त्याच परंपरेनुसार यंदाही शिरोळे कुटुंबीयांनी शाळेतील विद्यार्थिनींसाठी अत्यावश्यक साहित्यांचे वाटप केले. शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्स, तसेच मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक प्लेट्स शाळेला भेट म्हणून देण्यात आल्या.

या उपक्रमात संतोष शिरोळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी सहभाग घेतला. शाळेच्या गरजा ओळखून केलेले हे योगदान अत्यंत कौतुकास्पद असून, समाजात सकारात्मक आदर्श निर्माण करणारे आहे.

शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिरोळे कुटुंबाचे मन:पूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन साधेपणात, परंतु प्रेमळ वातावरणात पार पडले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, बंडू बरगाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान नदाफ, कृष्णा पुजारी, सुकुमार पाटील, विशाल जाधव, पत्रकार संतोष तारळे, मुख्याध्यापक सुभाष तराळ, शिक्षक बाळू यादव यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच एकता ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष