दलित पॅंथर जिल्हाध्यक्षपदी प्रियांका कांबळे, कार्याध्यक्षपदी अविनाश कांबळे यांची निवड

संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रियांका सुभाष कांबळे यांची, तर जिल्हा कार्याध्यक्षपदी अविनाश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित पँथरचे प्रा. अशोक कांबळे यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले.

या प्रसंगी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये मुबारक शेख, अब्दुल गफूर शेख, सुधीर कमलाकर, प्रशांत माने, रवींद्र धुमाळ, संजय यादव, सुभाष भंडार कवठे, दत्तात्रय गायकवाड, सुभाष कांबळे, सचिन कांबळे, हाणोक कांबळे, भिमन्ना वडर, चंद्रकांत कांबळे, सौ. अपेक्षा कांबळे, सौ. मनीषा कांबळे, सौ. संतोषी कोले, ज्योती भास्कर, सुहास कांबळे, सचिन मोरे आदींचा समावेश होता.नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक चळवळीला नवे बळ मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष