उद्या कुरुंदवाड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले; ज्येष्ठ नेते स्मृतीशेष गौतमरावजी ढाले घरी भेट देऊन करणार सांत्वन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नाम. रामदासजी आठवले हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्मृतीशेष गौतमरावजी ढाले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन करणार आहेत.
सकाळी 10.30 वाजता ढाले कुटुंबीयांच्या राहत्या घरी भेट देऊन ते स्मृतीशेष नेत्यांना आदरांजली अर्पण करतील. यानंतर महामहीम राज्यपाल "पद्मश्री" डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील निवासस्थानीही ते सदिच्छा भेट देतील.
दुपारी ते कुरुंदवाड येथून सांगली जिल्हा दौऱ्यावर रवाना होणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या आदेशानुसार शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे, सचिव बाळासो कांबळे, युवक तालुका अध्यक्ष अभिजीत आलासकर, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, कार्याध्यक्ष विक्रम माने, शहराध्यक्ष सुरज शिंगे यांनी दिली.
यावेळी युवक नेते धम्मपाल ढाले हेही उपस्थित राहणार असून, तालुक्यातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व विविध आंबेडकरी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा