हेरले येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना चंदूकाका सराफ ज्वेलर्सतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन येथे चंदूकाका सराफ ज्वेलर्स, कोल्हापूर यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुसह्य होईल, असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. या उपक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकांनी केले होते. कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास काशीद, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले, चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे व्यवस्थापक राजेंद्र पाटील व मार्केटिंग ऑफिसर धनंजय पाटील उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षकवृंद, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा