कुरुंदवाड येथे शेतमजूर व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र बहुजन शेतमजूर संघटना व शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गरीब व गरजू २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे व वेध फाउंडेशनच्या प्रमुख रजनीताई शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सदाशिव आंबी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.दिव्यांग महिला आघाडी संघटनेच्या सुनिता पाटील यांनी स्वागत केले. सुशीला पुजारी यांनी प्रास्ताविक भाषणात संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली.

           यावेळी सदाशिव आंबी म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासना योजना आखल्या असल्या तरी त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत. दिव्यांगांच्या व्यथा व अडचणी दूर करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याची गरज आहे. दिव्यांगत्वावर मात करून स्वतःपेक्षा समाजातील गरजूंना मदत करणारी ही संघटना समाजाला नवी ऊर्जा देत आहे. मनाने अपंग झालेल्या समाजातील घटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम सुरू असून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने शालेय विद्यार्थ्यांना केलेली मदत निश्चितच प्रेरणादायी आहे.

           पोलीस मित्र असोसिएशनचे प्रमुख युवराज मोरे म्हणाले, दिव्यांग व परिस्थितीमुळे अनेकांसमोर अडचणी आहेत. मात्र स्वतःची अडचण बाजूला ठेवून समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून दिव्यांग संघटनेने आदर्शवत उपक्रम राबवून समाजाला दिशा दिली आहे. अशा चांगुलपणाच्या कामात पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन संस्था सामाजिक कार्यात सहभागी होऊन दिव्यांग, गरजू व निराधार व्यक्तीना मदत करण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन त्यांनी दिले.

         रजनीताई शिंदे, डॉ दगडू माने, शिवगोडा पाटील,अनिता कुरणे ,रुकच्या केरूरे , संजय पाटील - कुरुंदवाडकर आदिनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लखन कांबळे - टाकवडेकर व राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ दगडू माने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      या समारंभास बाळासाहेब गुरव , प्रहार दिव्यांक्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सय्यद पिरजादे , उपाध्यक्ष अनिल देशमुख ,सुधाकर तावदारे , शिवगोंडा पाटील , राणी गवळी , बंडा परीट , सचिन कमलाकर , दिलीप माने , प्रदीप आयगोळे , यश जाधव, तुफान कोळी, विनायक चुडमुंगे

आदि उपस्थित होते. सुधाकर तावदारे यांनी आभार मानले.

--------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष