मंगराया विकास सेवा संस्थेस नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव यांची भेट

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

तेरवाड ता.शिरोळ येथील मंगराया विकास सेवा संस्थेस राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक तथा नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव यांनी भेट देवून संस्थेच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला.संस्थेचे प्रमुख शाबगोंडा पाटील व अध्यक्ष दत्तगोंडा पाटील यांनी श्री.जाधव यांचे स्वागत केले.

मंगराया विकास संस्थेच्यावतीने नाबार्डच्या पॅक्स टू मॅक्स योजनेतून ट्रॅक्टर व शेती मशागतीची विविध अवजारे (अवजारे बँक ) घेण्यात आली असुन शेतकर्‍यांना किफायतशीर दरात मशागतीसाठी ही अवजारे दिली जातात.खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत कमी दरात मशागत होत असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होत आहे.सेवा संस्थेकडून अवजारे बँक योजना नेमकी कशापद्धतीने चालविण्यात येते.शेतकर्‍यांना त्याचा लाभ होतो किंवा कसे याबाबतचा आढावा जिल्हा विकास अधिकारी श्री.जाधव यांनी घेतला.कांही शेतकर्‍यांच्या मुलाखतीही घेतल्या व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

संस्थेचे प्रमुख शाबगोंडा पाटील म्हणाले,नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून संस्थेला १२ लाखांचे अर्थसहाय्य अवजारे बँक योजनेसाठी मिळाले होते.त्यातून शेतीच्या मशागतीसाठी लागणारी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे घेण्यात आली असून कमी भाड्यात संस्थेचे सभासद व अन्य शेतकर्‍यांना मशागतीसाठी या अवजारांचा पुरवठा केला जातो.संस्थेने जातिवंत म्हैस खरेदीसाठीही कर्ज दिले आहे.

यावेळी बँक निरीक्षक वृषभ उपाध्ये, रमजान जमादार युवराज पाटील सिद्रामय्या मठपती प्रकाश कोळी अरुण गायकवाड रमेश बंडगर बाळकृष्ण माळी मदन कुंभार राजेंद्र कांबळे यांच्यासह अमोल खोत सुरज कांबळे देवेंद्र खोंबारे मल्लापा नरुटे कृष्णा कोळी भोपाल मगदुम अक्षय पाटील तातोबा बंडगर विनायज पुजारी मनोज भोई आदि उपस्थित होते.सचिव श्रीशैल मठपती यांनी आभार मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष