जिल्हा परिषद शाळेतच गुणवत्ताधारक शिक्षण : विस्तार अधिकारी अनिल ओमासे

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खरा पाया याच ठिकाणी घातला जातो. येथे शिकून अनेक विद्यार्थी यशस्वी जीवन घडवत आहेत. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषद शाळांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे प्रतिपादन शिरोळ तालुक्याचे विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी व्यक्त केले.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड कन्या विद्या मंदिराच्या विद्यार्थीनी कु. अक्षरा पाटील आणि कु. अमृता पाटील या विद्यार्थिनींचा ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती शिरोळचे समन्वयक शंकर बरगाले, मुख्याध्यापक सुभाष तराळ व मार्गदर्शक शिक्षिका सरिता पाटील हे उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्यात विद्यार्थिनींचा यशस्वी प्रवास, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा यांचे कौतुक करण्यात आले. अनिल ओमासे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता, यथोचित सुविधा व गुणवंत शिक्षक यामुळेच आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत असल्याचे सांगितले. या विद्यार्थिनींना गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभण्याचे सांगितले.

या प्रसंगी शंकर बरगाले यांनी देखील विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचा व शिक्षकांचा वाटा किती महत्त्वाचा असतो, हे अधोरेखित केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थीनी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष