एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात कृषी विभागाने साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम शिरोळ (ता. शिरोळ) येथे उत्साहात राबविण्यात आला.

 या कार्यक्रमात विविध खात्यांतील अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले.

या उपक्रमात ग्राम महसूल अधिकारी एस. बी. घाटगे, प्रगतशील शेतकरी अविनाश माने, सुधीर अशोक चौगुले, किरण देशमुख, मंडळ अधिकारी आरगे साहेब, कोतवाल धामणे, अशोक चौगुले आणि सौ. बन्ने यांनी पी.एम. किसान, अँग्री स्टॅक आणि इतर कृषी योजनांबाबत माहिती दिली. योजनांचा लाभ कसा घ्यावा, अर्जाची प्रक्रिया, आणि ऑनलाईन नोंदणीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात कृषी मित्र कुरणे, महसूल सेवक धामणे शिरोळ, सहायक कृषी अधिकारी श्रीमती एस. एम. कांबळे, आणि समन्वय अधिकारी श्री. मुकेश साजगणे यांनी शेतकऱ्यांच्या शंका व अडचणी ऐकून घेतल्या.

प्रमुख वक्त्या सौ. कल्पना माळी यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) याविषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा संतुलित व शास्त्रीय वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, कृषी व महसूल विभागाने एकत्र येत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केल्याचे समाधान उपस्थितांमध्ये दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष