मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ मध्ये रक्तदान शिबिर संपन्न
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने व तालुक्याचे भाजपचे नेते श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यात विविध गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले .
शिरोळ नगरपरिषद चे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या . यावेळी कोल्हापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक - निंबाळकर , कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ डांगे, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक , माजी जि . प सदस्य विजय भोजे , गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख , शिवाजी जाधव - सांगले , माजी तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे , त्याचबरोबर शिरोळ मंडळाचे अध्यक्ष महेश देवताळे , जयसिंगपूर मंडल चे सचिन ताडे , कुरुंदवाड मंडलचे रमेश चव्हाण , मिलिंद भिडे , राजेंद्र दाईगडे , रमेश यळगुडकर, सुनिल ताडे, सुभाष परीट तसेच जयसिंगपूर , शिरोळ, व कुरुंदवाड नगरपरिषदचे आजी- माजी नगरसेवक, तालुक्यातील विविध संस्थेच पदाधिकारी , ग्रा.पं. सदस्य , भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा