न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी
अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे हिमोग्लोबिन तपासणी व एच पी व्ही लसीकरण आरोग्य केंद्र शेडशाळ यांचे मार्फत पार पडले.हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि दीपिका फाउंडेशन यांच्यातर्फे एचपीव्ही लसीकरण न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी देण्यात आली. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर संरक्षणासाठी टिकाकरण उपलब्ध करून भारतातून स्त्रियांच्या गर्भाशयाचे उच्चाटन करण्यासाठी ९ ते २६ या वयोगटातील मुलींसाठी एक डोस दिला गेला. ही लस विवाहपूर्वी घेतल्यास जास्त हितकारक आहे.ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. त्यापासून कोणत्या प्रकारचा धोका नाही असे प्रतिपादन आरोग्य अधिकारी प्रियांका दशवंत यांनी केले.इयत्ता नववी व दहावीतील सोळा विद्यार्थ्यीनींना ही लस देण्यात आली. यापूर्वी सर्वांच्या पालकांची परवानगी घेण्यात आली होती. तसेच इयत्ता सातवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यीनींचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी प्रियांका दशावंत, आरोग्य सेवक सुलतान दस्तगीर मुजावर, आरोग्य सेविका पुनम भंडारे, वैदेही कोरवी व आशा वर्कर. शोभा आवळे,अक्काताई कोल्हापुरे, जयश्री आवळे प्राजक्ता केरीपाळे, निशा मानकापूरे. सहाय्यक शिक्षिका पद्मावती घाट व शिक्षक रियाज जमादार,सर्व शिक्षक व विद्यार्थीनी हजर होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा