छोट्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा करून देणारा प्रयोग यशस्वी करू या : धनाजी चुडमुंगे

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 मजूर टंचाईमुळे कारखाण्याना मशीन द्वारे ऊस तोडण्याचे नियोजन मोठया प्रमाणात करणे क्रमप्राप्त ठरत आहे पण उसाच्या लहान क्षेत्रात मशीनने ऊस तोडणे अशक्य व नुकसानीचे ठरत आहे त्यामुळे कारखाण्याच्या जवळ असणाऱ्या छोटया शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खुद तोड खुद वाहतुकीच्या या प्रयोगात भाग घेऊन आपला फायदा करून घ्यावा असे प्रतिपादन आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे केले.

ते काल राजाराम शाळेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद मंडळाचे सचिन देशमुख होते.

जवळच्या शेतकऱ्यांचा वेळेत ऊस तुटावा आणि उसाला जादा दर पण मिळावा या उद्देशाने आंदोलन अंकुशने खुद तोड खुद वाहतुकीचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे या प्रयोगाची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी संघटनेकडून बैठकां घेतल्या जात आहेत. या प्रयोगाविषयीं माहिती देताना चुडमुंगे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी पूर्वी सारखे पैरा करून किंवा मजुरांच्या मदतीने स्वता ऊस तोडून घ्यायचा, संघटना तो ऊस भरून वाहतूक करणार यातून शेतकऱ्याला 300 ते 700 रुपये उसाला जादा दर मिळणार असून या प्रयोगात शेतकऱ्यांनी भाग घेऊन हा प्रयोग यशस्वी करावा असेही त्यांनी शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.

कृष्णा देशमुख यांनी प्रास्ताविक केले तर महेश जाधव यांनी आभार मानले यावेळी राकेश जगदाळे, संभाजी माने संपत मोडके राहुल मोडके यांच्यासह सुभाष देशमुख,धनाजी डकरे, बाळासाहेब कदम, रामदास गावडे, विनायक देशमुख,विनायक पाटील, गणेश देशमुख, संदीप काळे, दरगु गावडे, राजेंद्र चुडमुंगे व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष