महात्मा गांधी विद्यालय, रुकडी येथे पालकसभा उत्साहात संपन्न

 


संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :

हातकणंगले तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, रुकडी येथे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

गुरुकुल संकल्पनेबाबत मार्गदर्शन गुरुकुल विभाग प्रमुख सौ. पाटील मॅडम यांनी केले. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत श्री. शेलार सर यांनी माहिती दिली, तर एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेच्या तयारीबाबत श्री. कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

पालक प्रतिनिधी सौ. अनुजा पाटील यांनी शाळेतील शिस्त, शिक्षकांची मेहनत आणि उपक्रमशीलता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री. जे. ए. पाटील व पर्यवेक्षक श्री. वजरीणकर सर उपस्थित होते. त्यांनी शाळेतील नवनवीन उपक्रम, विद्यार्थ्यांना भेडसावणारी आव्हाने तसेच रयत शिक्षण संस्था राबवत असलेल्या प्रकल्पांची माहिती आपल्या मनोगतातून मांडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. बंडगर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. ए. एम. पाटील सर यांनी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष