आमदार अशोकराव माने यांच्या प्रयत्नातून संदीप कोळी यांच्या उपचारासाठी१ लाखाची मदत



हातकणंगले / शिवार न्यूज नेटवर्क :

 हातकणंगले तालुक्यातील हिंघणगाव येथील रहिवासी संदीप शिवाजी कोळी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाली असून, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गरजू रुग्णास दिलासा मिळाला आहे.

संदीप कोळी यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या आर्थिक अडचणीची दखल घेत आमदार माने यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम थेट कॅनरा बँकेतील संबंधित रुग्णाच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

“आयुष्य सेवा हीच ईश्वर सेवा” या ध्येयाने प्रेरित होऊन आमदार माने यांनी अद्ययावत जनसेवेचा प्रत्यय देणारे हे कार्य केले. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर राहणाऱ्या आमदार माने यांच्या पुढाकारामुळे हातकणंगले मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात आहे.

या निर्णयामुळे रुग्णाच्या कुटुंबावरचा आर्थिक ताण काहीसा हलका होणार असून, रुग्णास लवकर बरे होण्यासाठी आवश्यक उपचार मिळण्यास मदत होणार आहे. हातकणंगले मतदारसंघात अशी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आमदार माने यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष