बाळू गायकवाड यांच्या माध्यमातून हेरवाडच्या मातंग समाजाला मिळाले पहिले डॉक्टरेट

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावातील मातंग समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळू शिवाजी गायकवाड यांना "मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, फरीदाबाद (हरियाणा)" या संस्थेने सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. या पुरस्काराची नोंद ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.

डॉ. गायकवाड हे अनेक वर्षांपासून समाजसेवेसाठी कार्यरत असून, विशेषतः उपेक्षित घटकांमध्ये जागृती, शिक्षणप्रसार व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून, मातंग समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बाळू गायकवाड यांना राज्य शासनाचा अण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.

हेरवाडसारख्या ग्रामीण भागातून मातंग समाजातील व्यक्तीला मिळालेला हा डॉक्टरेट सन्मान म्हणजे समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या पुरस्कारामुळे गायकवाड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, संपूर्ण हेरवाड गाव व मातंग समाजात आनंदाचे वातावरण आहे. हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे, अशा भावना डॉ. बाळू गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष