रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉ. अतिक पटेल

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

रोटरी ट्रेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉ. अतिक पटेल,सेक्रेटरी महेंद्र पोरवाल व खजिनदार अॅड. उदय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हा ५ वा पदग्रहण सोहळा शनिवार दि. २६ रोजी सहकारमहर्षि शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे संपन्न होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष राकेश पारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

   रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी गेल्या ५ वर्षापासून जयसिंगपूर शहर व परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. घोसरवाड येथील वृध्दाश्रम हे रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीच्या मदतीने चालू आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्याने रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर ट्रेड सिटीचा मोलाचा वाटा आहे.

रोटरी वर्ष १ जुलैपासून सुरू होत असून या नवीन वर्षामध्ये २०२५ पदग्रहण सोहळास पदग्रहण ऑफिसर म्हणून रोटे. डिस्ट्रिकट ३१३२ चे माजी प्रांतपाल रोटे. हरिश मोटवाणी (बीड) उपस्थित राहणार आहेत. माजी सहाय्यक प्रांतपाल रोटे. दादा चौगुले, नूतन सहाय्यक प्रांतपाल रोटे. गिरीष कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार बैठकीस रोटे. डॉ. अतिक पटेल, रोटे. महेंद्र पोरवाल, रोटे. अॅड. उदय कुलकर्णी, रोटे. राजकुमार बलदवा, शिवराज पाटील, प्रशांत पाटील, मिलिंद भिडे, महेश पाटील, संतोष खामकर, रमेश यळगुडकर, कुलदीप विभूते, सुरज माळी, मनोहर माळी, आशिष गायकवाड, योगेश बलदवा, विनेश खाडे, इंतेखाब मारूफ, अभय बनजवाडे, अर्चना विभुते, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष