रोटरी ३१७० जिल्हाच्या क्रीडा प्रमुखपदी रोटे. संजय पाटील

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष रोटे संजय पाटील (माऊली) यांची रोटरी क्लबच्या ३१७० जिल्ह्याच्या क्रीडा प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे रोटरी क्लबचे जिल्हा.प्रमुख रोटे अरुण भंडारे यांनी घोषित केले आहे. 

जागतिक सामाजिक असणाऱ्या रोटरी क्लबचा ३१७० जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हाप्रमुख अरुण भंडारे यांनी घोषित केली आहे. रोटरीच्या क्रीडा विभागाची जबाबदारी रोटे संजय पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

रोटरी समुदाय सक्षम करणे, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे, विविध उपक्रमातून सामाजिक कार्याचा वारसा निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे रोटरीची सेवा करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून रोटरीचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन रोटरीचे जिल्हाप्रमुख रोटे अरुण भंडारे यांनी केले आहे. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून लोकाभिमुख समाजकार्य करण्याचे आश्वासन नूतन जिल्हा क्रीडाप्रमुख रोटे संजय पाटील यांनी दिले. रोटे संजय पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष