सामाजिक उपक्रमातून उल्हास पाटील यांचा वाढदिवस साजरा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर व युवा उद्योजक उल्हास उत्तमराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबविण्यात आले. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळा, दवाखाना यासह वृद्धाश्रम संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. दरम्यान, वाढदिवसानिमित्त उल्हास पाटील यांना सामाजिक ,राजकीय, सहकार व उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
येथील उल्हास पाटील युवा सोशल फाउंडेशन व भैय्या ग्रुप यांच्या वतीने वाढदिवसाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. येथील राजाराम प्राथमिक शाळेतील मुलांना मध्यान भोजन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या शिक्षणाची गोडी लागावी तसेच 'माझी शाळा, आदर्श शाळा ' याविषयी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद करण्यात आला. त्यानंतर शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
घोसरवाड येथील जानकी वृध्दाश्रम संस्थेला गव्हू , तेल , कडधान्य व भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वृद्ध माता-पिता यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांनी संस्थेचे कामकाज जाणून घेतले. संस्थेचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांनी स्वागत केले. संस्था अध्यक्ष ॲड विजय जमदग्नी यांनी वृद्धाश्रम संस्थेचा विस्तार आणि या कामातील अडचणीबाबत चर्चा केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने, कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत चुडमुंगे यांनी जानकी वृद्धाश्रम संस्थेच्या कामाचे कौतुक करून वृद्धाश्रमाला आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
यावेळी कवी उदय शिरोळकर, चंद्रशेखर माने - चुडमुंगे, राजाभाऊ काळे, मारुती जाधव, विजय काळे, भूषण काळे, दरगु काळे, नितीन जगदाळे, कल्पेश काळे व सर्जेराव कांबळे यांच्या उल्हास पाटील युवा फाउं ।डेशन व भैय्या ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा