सौ.मालनताई पाटील परिवाराकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गेली ३७ वर्षे मौजे आगर येथे अंगणवाडी सेविका म्हणून शिक्षण सेवेचे कार्य केलेल्या सौ मालनताई पाटील यांनी सेवानिवृत्त समारंभात शुभेच्छारुपी आलेल्या आणि आपल्या परिवारातर्फे विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविला.
सेवानिवृत्त समारंभात सौ मालनताई पाटील यांनी हार पुष्पगुच्छ न स्वीकारता, वह्या स्वीकारून त्या वह्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. शुभेच्छासाठी आलेल्या आणि आपल्या परिवाराकडून विकत घेऊन मौजे आगर येथील विद्यामंदिर धाकटे आगर, न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर, शिरोळातील राजाराम विद्यालय नं.२, केंद्रीय कुमार शाळा दत्तनगर, कन्या शाळा दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्रा. के. एम. भोसले, माजी अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), सदस्य चंद्रकांत भाट, यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य आणि शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा