आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्रीराम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, च्या गजरात हजारो भाविकांनी येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरात रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागली होती. विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

आषाढी एकादशीनिमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे श्री विठ्ठल रुक्माई मूर्तीस श्री. व सौ. नरेंद्र उत्तरवार, श्री. व सौ. नरेंद्र रावराणे, श्री. व सौ.ॲड. भालचंद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा करण्यात आली. 

पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची रीघ होती लागली होती. येणाऱ्या सर्व भाविकांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने खिचडी, केळी, राजगिरा लाडू यासह अन्य फराळाचे मोफत वाटप करण्यात आले.

सायंकाळी टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू नामाचा जागर करीत विठ्ठल मंदिरातून पालखी व दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. शहरात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. नागरिकांनी या दिंडीचे उत्साहात स्वागत केले. रात्री कीर्तन संपन्न झाले.

आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल पांडुरंग भक्त कैवारी देवस्थान ट्रस्टचे रावसाहेब देसाई, शशिकांत देसाई,  राजकुमार देसाई, जयसिंगराव देसाई, यशवंत उर्फ बंटी देसाई,धनाजीराव देसाई, विश्वजीत देसाई, पृथ्वीराज देसाई, धीरज देसाई, यशोधन देसाई, गुरुदत्त उर्फ टिल्लू देसाई, यांच्यासह वारकरी संप्रदाय व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष