नांदणीत मोटारपंपाची चोरी ; २० हजारांचा मुद्देमाल लंपास


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

नांदणी (ता. शिरोळ) येथील वठारे मळा परिसरात एका शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरट्यांनी सबमर्सिबल मोटारपंप चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बाहुबली बाळासो माणगावे (वय ३८, व्यवसाय शेती, रा. बुबणे मळा, नांदणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ६४८ मधील विहिरीत बसविलेला टेक्स्मो कंपनीचा ७.५ HP क्षमतेचा, सन २०२३ मधील TSM8HZDOL मॉडेलचा, सिरीयल नंबर 68101163723 असलेला हिव्या रंगाचा सबमर्सिबल मोटारपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ही घटना ५ जुलैच्या संध्याकाळी ७ ते ६ जुलैच्या पहाटे ६ या वेळेत घडली. उघड्यावर ठेवलेल्या मोटारपंपाची चोरी करून सुमारे २०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष