हेरवाडच्या माळी समाजाचा आदर्श घेण्यासारखा : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

समाजातील विधवा महिलांना २५ हजाराचे अर्थसहाय्य, मुलगी जन्माला आल्यास ५ हजार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माळी समाजाने राबविलेला नेत्रदानाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. हे उपक्रम राबवून या समाजाने शिरोळ तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. 

हेरवाड येथे माळी समाजाच्या वतीने संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते.  यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, आपली व आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर वेगवेगळे उपक्रम राबवून इतरांच्या पुढे आपल्या समाजाचा आदर्श कसा निर्माण होईल यासाठी हेरवाड येथील माळी समाज कार्य करीत आहे. संत सावता माळी यांच्या विचारांचा वारसा हा समाज पुढे नेत आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी अग्रेसर असेन, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दि. २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित रक्तदान शिबिराला युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. "रक्तदान - श्रेष्ठदान" या उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी ४ वाजता निघालेल्या दिंडी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय झाले. रात्री ७ वाजता पार पडलेल्या भजन कार्यक्रमानंतर, रात्री ८ वाजता ह. भ. प. लाला महाराज (नागाव) यांचे कीर्तन उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाले.

दि. २३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता काल्याच्या कीर्तनाने सुरुवात झाली. यानंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ह.भ.प. लाला महाराज, सरपंच सौ.रेखा जाधव, दिलीप पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष सुनील माळी, ग्रामपंचायत सदस्य हयाचांद जमादार, विजयमाला पाटील, चंद्रकला पाटील, सचिन पाटील, अर्जुन जाधव यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष