शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पातळीत सात फुटाने वाढ



अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

विविध धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत दिवसभरात तब्बल सात फुटाने वाढ झाली आहे. 

 कृष्णा- पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडल्याने तालुक्यातील नदीकाठावरील शेकडो एकर गवत कुरणे पाण्याखाली गेली आहेत.

  गेले दोन दिवस कोयना व वारणा धरणपाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु होती.यामुळे रविवारी सांयकाळनतंर दोन्ही धरणातील विसर्ग वाढविण्यात आला होता.परिणामी शिरोळ तालुक्यात काहीअंशी पावसाची उघडीप असली तरी दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत सतत वाढ होत राहीली आहे.

   कृष्णेच्या पातळीत सोमवारी तब्बल सात फुटाने वाढ झाल्याने नृसिंहवाडी दत्त मंदिराला पाण्याचा पुर्ण वेढा पडला आहे.

   सद्या धरणपाणलोटक्षेत्रात पाऊस प्रमाण कमी झाले आहे.यामुळे सोमवारी सांयकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेसहा फुटावरुन चार फुटापर्यंत खाली आणण्यात आले आहेत.यामुळे सोमवारी सकाळी सुरु असलेला एकुण ३१७४६ क्युसेक विसर्ग कमी होऊन सांयकाळी पाचनतंर तो २१८२४ क्युसेक करण्यात आला आहे.तसेच वारणा धरणातुन सुरु असलेला एकुण १४८८० विसर्ग थोडा कमी करुन सद्या १४७२५ क्युसेक करण्यात आला आहे.राधानगरी धरणाचे सोमवारी सकाळी सात वाजता ३ व ६ क्रमांकाचे दोन स्वंयचलित दरवाजे उघडे होते.यातुन एकुण ४३५६ क्युसेक विसर्ग सुरु होता.यामध्ये दुपारनतंर ३ क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला आहे.सांयकाळी चारवाजेपर्यंत ६ क्रमांकाचा एकच स्वंयचलित दरवाजा उघडा आहे. परिणामी राधानगरी धरणातुन एकुण २९२८ क्युसेक विसर्ग नदीपात्रात होत आहे.

  धरणपाणलोटक्षेत्रात पाऊसमान कमी झाल्यामुळे सोमवारी विविध धरणातुन करण्यात येणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे.

 दरम्यान रविवारी सांयकाळी चार वाजेपर्यंत नृसिंहवाडीजवळ कृष्णेची पाणी पातळी ४१फुट ७ इंच होती.ती सोमवारी सांयकाळी चार वाजता ४८ फुट झाली आहे.यावरुन २४ तासात कृष्णेच्या पाणी पातळीत सात फुटाने वाढ झाल्याचे दिसते.

 नृसिंहवाडीत कृष्णेची पाणी पातळी वाढल्याने औरवाड- नृसिंहवाडी दरम्यानचा जुना पुल सोमवारी पाण्याखाली गेला आहे.याचबरोबर जिल्ह्यातील विविध नद्यावरील ५५ बंधारे पाण्याखाली आहेत. 

 सोमवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ८५.४४ टीएमसी,वारणा धरणात २९.२०५ टीएमसी,राधानगरी धरणात ८.२८ टीएमसी तर अलमट्टी धरणात ९५.३३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

 दरम्यान सोमवारी शिरोळ तालुक्यात दिवसभर काही ठिकाणी पाऊस होता,तर पुढे काही अंतरावर गेल्यावर कडक ऊन असे श्रावणमासातील ऊन पावसाचा खेळ पहायला मिळाला.मात्र गेले दोन दिवस तालुक्यात जोरदार वार्‍याचा मारा होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष