श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी पार पडली. या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी सौ.रेखा तराळ, श्री. तुषार मधुलकर , ऐश्वर्या भब्बुरे उपस्थित होते.
या शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षण ,संस्कार याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची ही काळजी घेतली जाते.दरवर्षी या प्रकारची शिबिर राबवून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी केली जाते .शैक्षणिक जीवन जगत असताना आरोग्य निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयाबरोबरच होणारे शरीरातील बदल व निष्काळजीपणा याचा धोका ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होत असतो.यापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी आरोग्य तपासणी आवश्यक असते .याच अनुषंगाने या महाविद्यालयामार्फत दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येते. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.आर जे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम या महाविद्यालयात अविरतरित्या राबविण्यात येत असतात.यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना अनेक रोगांविषयी चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर जे पाटील वैद्यकीय अधिकारी सौ.रेखा तराळ ,तुषार मधुलकर, ऐश्वर्या भब्बुरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. जी बी कोळी, कु. पी ए. कोळी यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा