स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे : जिल्हा युवा शिवसेना प्रमुख राकेश खोंद्रे
दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या शासकिय योजनांचा लाभ घरोघरी पोहचवा . घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा चालू करा . सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवा शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हा युवासेना प्रमुख राकेश खोंद्रे यांनी दानोळी जि प मतदार संघाच्या आढावा बैठकीत बोलताना केले . उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती .दानोळी जि . प . मतदार संघामधिल सर्व गावातील शिवसैनिक या आढावा बैठकीस उपस्थित होते .आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.उपस्थितशिवसैनिकांना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनीही मार्गदर्शन केले .या आढावा बैठकीस हर्षवर्धन कापसे तालुकाप्रमुख रोहित भिसे राजेंद्र चौगुले सदाशिव शिंदे वसंत नाईक उदय माने सुशांत मलमे शुभम मलमे विभागप्रमुख चेतन माने अरुण होगले अजय माने सुशांत ढेंगे अथर्व केकले सिद्धार्थ कांबळे ऋत्वीक कांबळे संदीप पवार विशाल गावडे रोशन माने अक्षय माने अनमोल कांबळे तुषार नंदीवाले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते (सोबत फोटो )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा