अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 139 शाळा बंद



     कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे भुदरगड  तालुक्यातील 9,  गगनबावडा 46, करवीर 5, पन्हाळा 34 राधानगरी 30 व शाहूवाडी तालुक्यातील 15 अशा एकूण 139 शाळा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी बंद आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली आहे.


अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बंद असलेल्या शाळांची माहिती -

आजरा- एकूण शाळा- 165, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

भुदरगड- एकूण शाळा- 233, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 9, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 9

चंदगड - एकूण शाळा- 285, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

गडहिंग्लज- एकूण शाळा- 165, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

गगनबावडा - एकूण शाळा- 237, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 44, माध्यमिक 2, एकूण बंद असलेल्या 

हातकणंगले -एकूण शाळा- 560, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

कागल - एकूण शाळा- 250, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

करवीर- एकूण शाळा- 355, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 5, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 5

पन्हाळा- एकूण शाळा- 320, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 34, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 34

राधानगरी - एकूण शाळा- 280, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 30, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 30

शाहुवाडी- एकूण शाळा- 322, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 15, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 15

शिरोळ - एकूण शाळा- 304, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

मनपा, कोल्हापूर - एकूण शाळा- 288 बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 0, माध्यमिक 0, एकूण बंद असलेल्या शाळा- 0

अशा एकूण एकूण शाळा- 3684, बंद असलेल्या शाळा- प्राथमिक- 137, माध्यमिक 2, एकूण बंद असलेल्या शाळा- 139 शाळा बंद असल्याची माहिती डॉ. शेंडकर यांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष