कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीची आमदार यड्रावकर यांनी केली पाहणी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शहरातील पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य नूतन इमारतीची पाहणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली. स्वतंत्र कक्ष, प्रतिक्षालय, बैठकीसाठी केलेली आधुनिक व्यवस्था तसेच नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी नूतन इमारतीची सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांना दिली. पोलीस दलाच्या कामकाजात वेग व पारदर्शकता यावी तसेच नागरिकांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी या नव्या इमारतीतील सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे मत आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रमेश भूजुगडे, लक्ष्मण चौगुले, दादासाहेब पाटील, उदय डांगे, उमेश कर्णाळे, दीपक गायकवाड, दादेपाशा पटेल, शरद आलासे, अक्षय आलासे, सुरगोंडा पाटील, अर्जुन जाधव, अर्षद बागवान, रावसाहेब कुंभोजे, बाबासाहेब वनकोरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नवीन इमारतीमुळे पोलीस प्रशासनाला आवश्यक ती सुविधा मिळून कायदा व सुव्यवस्था राखण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा